हालाखीच्‍या आणि‍ कष्‍टदायी परि‍स्‍थि‍तीत शि‍क्षण्‍ा घेत वळि‍वडेतील युवकाने अमेरि‍केपर्यंत मजल मारली. अमेरि‍केतील स्‍ट‍ेट‍ युनव्‍हर्सल कॅ‍लि‍फोर्नि‍या युनि‍व्‍हर्सि‍ट‍ीमध्‍ये पोफेसर रि‍सर्च म्‍‍हणून ते सध्‍या काम प‍हात आहेत. ङॉ. शि‍वाजीराव बाप‍ूसो खाडे असे त्‍‍यांचे नाव आहे.

वळ‍ि‍वडेतील जीवन शि‍क्ष्‍ाण्‍ा मंदि‍र, गांधीनगरचे युवराज शाहू महाराज हायस्‍कूल, राजाराम महावि‍द्यालय कोल्‍‍हाप‍ूर नंतर मुंबई‍ इंजि‍नि‍अरिंग कॉ‍लेज असा शि‍क्ष्‍ाणाचा प्रवास करीत ड़ॉ. खाडे यांनी अमेरि‍केपर्यंत भरारी मारू‍न तेथेच स्‍थानि‍क झाले आहेत.

एम.ट‍ेक. प‍ीएच. डी. केलेल्‍‍या ड़ॉ. खाडे यांनी सुरवातीच्‍या काळ‍ात भारतातील शिकॉ‍म कंप‍नीमध्‍ये २ वर्ष्‍ा मॅ‍नेजर म्‍‍हणून जबाबदारी सांभाळ‍ली. त्‍‍यांनतर अमेरि‍केत एम.बीए. (प‍ीएच.डी) करू‍न अमेरि‍कन सरकारची स्‍ट‍ूडंट‍स् स्‍‍कॉलरशीप‍ मि‍ळ‍वली. आज ते सुमारे १९ वर्षाप‍ासून प्रोफेसर रि‍सर्च म्‍‍हणून जबाबदारी सांभाळ‍त आहेत.

वळ‍ि‍वडे येथे केवळ‍ १० गुंठे जमीन असलेल्‍‍या बाप‍ूसो खाडे यांनी प्रसंगी मोलमजुरी करू‍न मुलांच्‍या शि‍क्ष्‍ाणासाठी प्रयत्‍‍न केले. रावसाहेब त्‍‍यांचे चि‍रंजीव सध्‍या वकील आहेत. दुसरे चि‍रंजीव संभाजी शेती संभाळ‍तात. ड़ॉ. खाडे ५ ते ७ वर्षातून एकदा आप‍ल्‍‍या मायदेशी प‍रततात.

त्‍‍यावेळ‍ी ते आप‍ल्‍‍या गावक-यांच्‍या आणि‍ कुट‍ुंबि‍यांच्‍या आनंदात हरप‍ून जातात. ड़ॉ. खाडे यांचा मोठा मुलगा महेंद्र (संट‍ी) एमडी. सर्जनचे शि‍क्ष्‍ाण्‍ा घेतात. अमेरि‍कन युनि‍व्‍हर्सि‍ट‍ीमध्‍ये लहान वायाप‍ासून प्रथ्‍ाम येण्‍याचा मान त्‍‍याने मि‍ळवि‍ला आहे. ड़ॉ. खाडे यांची प‍त्‍‍नी ज्‍‍युलि‍या महावि‍द्यालयात प्राध्‍याप‍ि‍का म्‍‍हणून काम प‍ाहतात.

आप‍ल्‍‍या मुलांला भेट‍ण्‍यासाठी त्‍‍यांचे वडील बाप‍ूसो खाडे व त्‍‍याच्‍या मातोश्री ग्रीन कार्ड काढले आहे. त्‍‍यामुळ‍े कधीही येणे- जाणे त्‍‍यांना सोयि‍स्‍कर जाते. आत्‍‍तापर्यंत मातोश्री प‍ाचवेळ‍ा व वडील ३ वेळ‍ा अमेरि‍केत जाऊन आप‍ल्‍‍या कुट‍ुंबि‍यांत रममाण्‍ा झाले आहेत.

अमेरि‍केतील परि‍स्‍थि‍ती आणि‍ भारतातील परि‍स्‍थि‍ती याबाबत बोलताना खाडे यांचे कुट‍ुंबीय वि‍विध्‍ा माहि‍ती देतात. त्‍‍यांच्‍या मते अमेरि‍का भारताप‍ेक्षा दीडशे वर्ष प‍ुढे प्रगतीप‍थावर आहे. अमेरि‍केत राहणीमान उच्‍च आहे. मात्र आई, वडील, भाऊ बहीण्‍ा अशा नात्‍‍यांबद्दल तेथे भारतीयांइतकी आत्मि‍यता नाही केवळ‍ शिक्षणालाच तेथे महत्‍‍व दि‍ले जाते.

आप‍ली भारतीय संस्‍कृती श्रेष्‍ठ असल्‍‍याचे खाडे यांचे कुट‍ुंबि‍य आवर्जून नमूद करतात. मत मतांतर काही असले तरी वळ‍ि‍वडेतील युवकाने अमेरि‍केपर्यंत मारलेली मजल वळ‍ि‍वडे गावाला नि‍श्‍चि‍त अभि‍मानास्‍प‍द आहे.