महानिर्वाण्ा दिन
भारतरत्न ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण्ा दिन. वळिवडे येथे महात्मा गांधी तंटामुक्त अभियान व ग्रामपंचायत यांच्या अंतर्गत जातीय व धार्मिक सलोखा राबविण्याच्या दृष्टिकोतून भिमनगर को. ऑप. हौसिंग सोसायटी मध्ये जाउन महानिर्वाण्ा दिनी ड़ॉ. बाबासो आंबेडकराच्या पुतळयास हार घालण्यात आला. तंटामुक्त अभियानातील सर्व सदस्य व गावातील इतर हिंदूधर्मिय ग्रामस्थ मान्यवर व्यक्ती सरपंच, उपसरपंच तंटामुक्त समिती अध्यक्ष्ा व सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यामुळे बौध्द वस्ती ग्रामस्थामध्ये उत्साहाचे व आनंदी वातावरण्ा निर्माण्ा झाले. कारण्ा आपल्या धर्माची आस्था या कार्यक्रमातून दिसून येते. शांतते कडून समृध्दीकडे गावच्या विकासाची उन्नती व तंटामुक्त मोहिमेमुळे आहे. याविष्ायी उपस्थितीतांना तंटामुक्त समितीच्या वतीने माहिती देणेत आली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान
मौजे वळिवडे येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम
स्वच्छता अभियाना अंतर्गत ग्राम स्व्च्छ व सुंदर बनविण्याचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये तंटामुक्तीचे अध्यक्ष्ा व सर्व सदस्य ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, गावातील सर्व बचत गट यांनी सक्रिय सहभाग घेउन शासनच्या नियमानुसार प्रत्येक आठवड्या मध्ये वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. तसेच या अभियानामध्ये प्राथ्ामिक शाळा, माध्यमिक शाळा यांचेमार्फत नाले, बंधारे, सडक, पंचगंगा नदीवरील बंधा-याची सफाई व शौच ख्ाड्डे ख्ाण्ाण्यात आले व ग्राम स्वच्छता अभियान पार पाडण्यात आले.
महात्मा गांधी जयंती
मौजे वळिवडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जंयती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये फोटो पूजन करून साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य समितीचे अध्यक्ष्ा उपस्थित होते. यानंतर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांनी गांधी जयंती निमित्ताने गावात शांतता रहावी यासाठी तंटामुक्त गाव मोहिमेबाबत उपस्थितांना माहिती दिली. खादी उद्योगास प्रधान्य देउन उच्च विचाराने काम कारावे असे अवाहन करण्यात आले.
संत गाडगेबाबा जयंती
मौजे वळिवडे संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत व तंटामुक्त समिती यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथे गाडगेबाबा जयंती साजरी केली. निर्मल गाव मोहिमेत सर्वांच्या मदतीने गाव स्वच्छ झाले आहे. त्याचप्रमाणे आता माण्ासा-माण्ासातील वैर भाव मिटवून मने स्वच्छ करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे विचार लोकांसमोर मांडण्यात आले. या कार्यक्रमावेळी विविध्ा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
छत्रपति शिवाजी महाराज जयंती
वळिवडे ग्रामपंचायत कार्यालयात छ. शिवाजी महाराज यांच्या फोटोचे पूजन केले. अध्यक्ष्ा तंटामुक्त समिती यांचे
हस्ते तसेच छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयास हार घालून अभिवादन केले. या कार्यक्रमास ग्रामपंचयात सदस्य व तंटामुक्त सदस्य तसेच गावातील नागरीक हजर होते. सदर कार्यक्रमास तंटामुक्त अध्यक्ष्ा यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे महत्व विषद केले. शांततेतून प्रगतीकडे वाटचाल निश्चितपणे गावची प्रगती होणार असलेने त्यामध्ये सर्वांचा सहभाग हवा असे सांगण्यात आले. शिवाजी महारांजाच्या कामाचा आदर्श्ा घेउन तसेच त्यांचा न्याय करण्याचा पध्दतीचा अभ्यास करूनच समितीची वाटचाल करण्याचा निर्धार सर्व समिती सदस्यांनी केला.
रमजान ईद
मौजे वळिवडे येथील मुस्लिम बांध्ावांनी रमजान ईद मोठया उत्साहात साजरी केली. मुस्लिम बांध्ावांच्यावतीने हा सण्ा मोठा पवित्र व भाव भक्तीने धार्मिक स्थ्ाळी, नमाज पठण करून साजरा करण्यात आला. यानंतर ग्रामपंचायत, तंटामुक्त समिती व गावातील लोकांनी मसुदेमध्ये जाउन मुस्लिम बांध्ावांना शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांध्ावांनी त्या प्रितर्थ्य शिरा व गोड पदार्थ्ा देउन सर्वांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये हिंदू व मुस्लिम लोकांमध्ये आनंदी वातावरण्ा होते. प्रार्थ्ानास्थ्ाळी सर्व मुस्लिम बांध्ाव एकत्र येउन नमाज पठण्ा करून शांततेचे आव्हान केले.
ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर
ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देश्ासेवा, समाजसेवा या भावनेतून व मिळालेले भारतीय स्वातंत्र्य निरंतर अबाधित राहिले पाहिजे हा दृष्टिकोन समोर ठेवून भारत देशाची राज्यघ्ाटना लिहून ठेवली. त्याचप्रमाने राज्यकारभार चालत आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी ११ वाजता फोटो प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांच्या हस्ते भिमनगर येथील ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळयास महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वळिवडेचे अध्यक्ष्ा तसेच सरपंच, उपसरपंच यांनी हार घालून अभिवादन केले. सायंकाळी ७.३० वाजता भिमनगर येथील ड़ॉ. भिमनगर येथील ड़ॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची निवडणूक काढण्यात आली. आणि तंटामुक्त समितीचे सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य गावातील सर्व धर्मिय लोकांनी सहभाग घेतला व जयंती उत्सव आनंदाने विना पोलिस बंदोस्त शांततेने पार पाडला.
एक गाव एक गण्ापती
मौजे वळिवडे या गावामध्ये घरगुती गण्ापती व एक गाव एक गण्ापती स्थापन करून हा सण्ा आनंदी व उत्साही वातावरणात
पार पाडण्यात आला. सदर सप्ताहामध्ये कोण्ाताही अनुचित प्रकार घडला नाही. गणेश्ा चतुर्थीच्या काळामध्ये गावात समाजोयोगी कार्यक्रम राबविण्यात आले. मंडळामार्फत देखावे करीत असताना मनोरंजनात्मक गोष्टीकडे भर देण्यापेक्षा समाजाला दिशा देण्याच्या दृष्टीकोणाला भर देण्यात आले. तसेच दररोजच्या गणेश्ा आरतीसाठी सर्व मंडळाचे सभासद एकत्र येत होते. शेवटच्या दिवशी गणेश्ा विसर्जन होत असताना भजनी मंडळ विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. हा कार्यक्रम विना पोलिस बंदोस्ताशिवाय पार पाडण्यात आला.
दसरा सण्ा
मौजे वळिवडे गावामध्ये दसरा सण्ा पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या काळामध्ये मंदिरामध्ये घ्ाटस्थापना करण्यात आली. नवरात्र काळामध्ये मंदिरांवरती व घरांवरती विद्युत रोषणाई करण्यात आली. शेवटच्या दिवशी बिरदेव व नृसिंह या देवांच्या पालख्या काढण्यात आल्या होत्या. या पालखी मिरवणूकीमध्ये गावातील सर्व धर्माचे लोक व अबालवृध्द मोठया संख्येने उपस्थित होते. कोण्ाताही अनुचित प्रकार न घडता सोने लुटण्याच्या कार्यक्रम पार पाडला. विशेष करून या कार्यक्रमास पोलिस बंदोबस्ताची गजर भासली नाही. ग्रामसुरक्षा दलामार्फत मिरवुण्ाक शांततेत पार पाडण्यात आली. हा कार्यक्रम तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत यांच्यावतीने शांततेत पार पाडण्यात आली.
