आश्चर्य वाटेल. वळिवडे गाव हे राजधानी म्हणून कित्येक वर्षे परिचित आहे. मध्ययुगीन काळात जैनकालीन शिलाहार राजाची राजधानी म्हणून गावाने नावलौकिक मिळविला. शिलाहार राजांच्या राजवटीच्या माहितीमुळे वळिवडे राजधानी होती, हे स्पष्ट झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूर, सातारा, सांगली, आणि बेळगाव या आजच्या जिल्हांचा प्रदेश्ा कोल्हापूरच्या शिलाहारांच्या ताब्यात होता. त्याच काळात राष्ट्रकुटांची सत्ता कमकुवत झाली होती.
त्यामुळे शिलाहार राजे स्वतंत्र सत्ताधीश्ा होते. शिलाहार राजे आपल्या लेखांत त्यांच्या तीन राजधान्यांचा उल्लेख्ा करतात क्षुल्लकपूर (कोल्हापूर), पद्मनाल (पन्हाळा), वल्लवाड (वळिवडे), शिलाहारची मुख्य राजधानी कोल्हापूर (क्षुल्लकपूर), येथे होती. हे नगर सातवाहनांच्या पूर्वीपासून असल्याचा संदर्भ मिळतो.
या राजवटीतील राजाने आपले काही ताम्रपट (आदेश्ा) वलयवाड (वल्लवाड) किंवा वळवाड येथून दिल्याचे आढळते. त्यामुळे वळवाड ही त्यांची राजधानी असावी. वळवाड नेमक्या कोण्ात्या ठिकाणी असेल. याबाबत मात्र इतिहासतज्ज्ञांत उलटसुलट मते आहेत.
काहींच्या मते कोल्हापूरच्या पूर्वेस असलेले वळिवडे हे ठिकाण्ा असावे. परंतु सद्य:स्थितीस प्राचीन काळातून वस्तू काळाच्या ओघात नाहीशा झाल्या असाव्यात शिवाय पंचगंगा नदीकाठी गाव असल्यामुळे मोठया महापुराचा या गावाला फटका बसला असण्याची श्ाक्यता आहे. काहींच्या मते वळिवडे हे शिलाकार राजाचे हिवाळा ऋतूतील वास्तव्याचे ठिकाण्ा असण्याची श्ाक्यता आहे.
जवळजवळ १००० वर्षांचा प्रदीर्घ्ा काळ लोटूनसुध्दा शिलाहारकाळात बांध्ालेली अनेक मंदिरे आजसुध्दा उत्तम स्थितीत असून त्याकाळी स्थापत्यकला व शिल्पकला उत्कर्षांला पोहोचल्याचे निदर्श्ाक आहेत. कोल्हापूर जिल्हांतील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वराचे अतिभव्य मंदिर शिल्पकलेचे एक वैभवशाली प्रतिकच आहे. इतिहासतज्ञांत काही गोष्टीत दुमत असले तरी वळिवडे ही राजधानी असावी, अशी माहिती आजही मिळत आहे. वयोवृध्दांकडील माहितीनुसार सध्याच्या प्राथ्ामिक शाळेच्या ठिकाणी सभोवताली मोठी तटबंदी होती.
तटबंदी एवढी भक्कम व रूंद होती की, त्यावरून भरलेल्या बैलगाडीचीही वाहतूक व्हायची. काळाचे ध्ाक्के खात ही तटबंदी नामशेष्ा झाली तरी तिची आठवण्ा मात्र आजही सांगितली जाते. काही वर्ष त्या ठिकाणाला रामाचं मंदिर म्हणूनही ओळख्ालं जायचं.
वळिवडे येथे ठिकठिकाणी प्राचीन मूर्तींचे अवशेष विखरून पडलेले आहेत. मात्र अद्याप त्याचा अभ्यास झाला नाही. त्यावर संशोध्ान व्हावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. वळिवडे गावाला धार्मिक संदर्भही आहे. गावाच्या पश्चिम बाजूला नदीकाठी असलेल्या आडव्याप्पाच्या मठाचा || नवनाथ्ा || ग्रंथात वळवाड असा उल्लेख्ा आढळतो. अनेक महात्म्यांच्या पावन उपस्थितीमुळे मठ हजारोंचा श्रध्दास्थान बनला आहे.
अलीकडच्या काळात छत्रपती शाहू महाराजांच्या कारकीर्दीत वळिवडे गाव त्यांचे शिकारी पार्क होते. कधीकाळी घनदाट जंगल असलेल्या वळिवडे गावच्यां मातीने अनेक राजे-महाराजांची पायधूळही अनुभवली आहे. वळिवडेच्या हद्दीत पोलंडची वसाहत निर्माण्ा झाली. वळिवड्याच्या कॅम्पने पोलंडवासियांना आधारही दिला आहे. पोलंडवासीय मायदेशी परतले. भारत-पाक फाळणीनंतर वळिवड्याच्या कॅम्पमध्ये सिंधी समाज लोकांनी वसाहत उभारली.
स्वातंत्र्यानंतर कापड व्यवसायात स्थिर होत गांधीनगर कॅम्पने नावलौकिक प्राप्त केला. पांढ-या मातीचा बुरूज गेला, पोलंडची वसाहत गेली. शिलाकार राजधानीच्या प्राचीनकालीन अवशेषांचा नामशेष झाला. मात्र वळवाड ग्रंथातला उल्लेख्ा वळिवडेवासीयांना सुख्ाद अनुभव देणाराच ठरावा. गावचे ग्रामदैवत श्री बिरदेव, श्री राम मंदिर, श्री नृसिंह मंदिर, श्री हनुमान मंदिर, महादेव मंदिर, गणेश्ा मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री दिगंबर जैन मंदिर, मरगाई मंदिर आहेत.
वळिवडे गावामध्ये आड्यापाचा ऐतिहासिक मठ सुप्रसिध्द आहे. हे गाव श्री शिलाहार राजे यांची राजधानी असून ऐतिहासिक वारसा संपन्न असे गाव आहे. सन २००९-२०१० पासून गावातील एकही तंटा गांधीनगर पोलिस स्टेशनला नोदला नाही. हे गाव महाराष्ट्रात संपूर्ण्ा तंटामुक्तीकडे वाटचाल करीत आहे. हे गाव प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तसेच या गावात महात्मा गांधी तंटा मुक्त मोहिम जोरात सुरू आहे.
स्वच्छता :
वळिवडे, ग्रामपंचायतीने कचरा गोळा करून दररोज त्याचा उठाव करण्यासाठी स्वमालकीचा ट्रॅक्टर खरेदी केला आहे. यामुळे दररोज कच-याचा उठाव केला जातो. दररोज गावात औषध्ा फवारणी केली जाते.
